नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटीला शिवसेना बांधावर

पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या - शिवसेना नेते चंद्रकांत खैरे

छत्रपती संभाजीनगर : शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी थेट फोनवर फकिरा मोरे या शेतकऱ्यांशी संवाद साधला. अवकाळी पावसाने झालेली नुकसान व परिस्थिती जाणून घेत दिलासा दिला. यानंतर उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटीला शिवसेना बांधावर पोहचली. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी गंगापूर, वैजापुर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन व्यथा जाणून घेतल्या.
शुक्रवारी गंगापूर तालुक्यातील भिवधानोरा, अगरवडगाव, गणेशपूर, गळनिंब, कायगाव आदी भागात पाहणी केली.
यावेळी तालुकाप्रमुख दिनेश मुथा, उपतालुका प्रमुख पोपट गाडेकर, विभागप्रमुख गोकुळ तांगडे, कृषी विभागाचे कांचन शेटे, मनिशा तंगीड, ग्रामसेवक पातकाळ, तलाठी सुनील ढोले, मंडळ अधिकारी सोनटक्के, किसान सेनेचे तालुका संघटक गजानन गायकवाड, योगेश आवारे , नवनाथ काकडे, प्रदीप निरफळ, रामेश्वर नवले, सरपंच रामेश्वर चव्हाण, उपसरपंच बाबासाहेब चव्हाण, सभापती मधुकर चव्हाण, नवनाथ निरफळ, गणेश कान्हे, नानासाहेब वाघ, शेतकरी, शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

शेतकऱ्यांना तातडीने मदत करा – चंद्रकांत खैरे

एकीकडे सरकार आपले लोक आणि सरकार वाचविण्यासाठी व्यस्थ आहे. मात्र अन्नदाता बळिराजा शेतकरी आवकाळी पावसाने संकटात सापडला आहे.
हाता तोंडाशी आलेला घ्यास हिरावून घेतला. गव्हु, कांदा, फळबागा, भाजीपाला आदीं पिंकाचे मोठे नुकसान झाले. या सर्व पिकांचे पंचनामा करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या, अशी मागणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *