राऊत यांची सुटका अन् जल्लोष
खासदार संजय राऊत यांची अटक बेकायदा असल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने संजय राऊत यांची सुटका करण्याचे आदेश दिले. ईडीची कारवाई हेतुपुरस्सर असल्याचे ताशेरे न्यायालयाने ओढले आहे. राऊत यांच्या सुटकेचे राज्यभरात स्वागत करण्यात आले आहे. शिवसैनिकांनी विविध शहरात, गावात फटाके फोडून आणि ढोलताशाच्या निनादात राऊत यांच्या सुटकेबद्दल आनंद व्यक्त केला.