एफआरपी’ एकरकमी देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यभर ऊसतोड बंद आंदोलन
‘एफआरपी’ एकरकमी देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यभर ऊसतोड बंद आंदोलन केले. साखरेचे दर वाढवा आणि उसाचे योग्य वजन करण्याच्या मागणीसाठी शेतकरी आणि ऊसतोड कामगारांना दोन दिवस आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात कोल्हापूर, पुणे, औरंगाबाद, बुलढाणा, सातारा जिल्ह्यात ऊसतोड ठप्प झाली. काही भागात आंदोलकांनी रास्ता रोको केला.