भाजपची राहुल गांधी यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ ठिकठिकाणी निदर्शने
वि. दा. सावरकर घाबरट होते. त्यांनी इंग्रजांची माफी मागून अंदमान कारागृहातून स्वत:ची सुटका करुन घेतली, असे वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान केले. या वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटले आहेत. भाजपने राहुल गांधी यांच्या निषेधार्थ ठिकठिकाणी निदर्शने केली. औरंगाबाद शहरात भाजप कार्यकर्त्यांनीही आक्रमक आंदोलन करीत काँग्रेसचा निषेध केला.