मराठ्यांची वारी…… मुंबईच्या दारी | Manoj Jarange Patil |Maratha Reservation |
अंतरवाली इथून निघालेल्या या मोर्च्याचा मार्ग कसा असेल हे पाहुयात..
Maratyanchi Vari Mumbai
२० जानेवारी रोजी मराठा आंदोलक आंतरवाली सराटी इथून निघाला असून , त्यांचा पहिला मुक्काम बीडमधील मातोरी गावाच्या परिसरात असेल. २१ जानेवारी रोजी करंजी घाट, बाराबाभळी जिल्हा अहमदनगर, २२ जानेवारी रांजणगाव, २३ रोजी- खराडी बायपास , २४ जानेवारी लोणावळा, २५ जानेवारी वाशी नवी मुंबई याप्रमाणे आंदोलकांचा मार्ग असेल. या मार्गावर आंदोलकांसाठी सामाजिक संस्थांतर्फे सेवा पुरविली जाईल. २६ जानेवारी रोजी वाशी किंवा चेंबूर इथून आझाद मैदानापर्यंत पायी जाऊन उपोषण सुरू करणार असल्याचे जरांगे-पाटील यांनी सांगितलं.
हा मोर्च्या मुंबईत गेल्यावर दोन ठिकाणी थांबणार असून, आझाद मैदान आणि शिवाजी पार्क या दोन्ही मैदानावर मराठा समाज थांबेल असं जरांगे म्हणाले.
दरम्यान, वारंवार अंतरवालीला येणारं मंत्र्यांचं शिष्टमंडळ आता कुठं गेलं? आम्हाला फक्त फसवायला गावात यायचे का? असा सवाल जरांगे यांनी उपस्थिती केला आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून आरक्षणाचा मार्ग काढावा, असं आवाहन जरांगे यांनी फडणवीसांना केलं आहे.
मुंबई आंदोलनाची तयारी मराठा समाजाकडून मागच्या महिन्यापासून सुरु असून, या तयारीत अर्थात पायी वारीत सर्व आंदोलकांच्या खाण्यापिण्याची सोय करण्यात आली आहे.
शेकडो ट्रॅक्टरसह, अनेक वाहनातून आवश्यक त्या वस्तू सोबत घेतल्या असून, शिस्तीत आंदोलन व्हावं, यासाठी जरांगे यांनी मराठा आंदोलकांना आवाहन केलं आहे. दरम्यान, या आंदोलनासाठी शेकडो स्वयंसेवक नेमण्यात आले असून ते जरांगे यांच्या सुरक्षेची काळजी घेतील.
शासनाने ही या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आणि जरांगे यांच्या सुरक्षेसाठी शेकडो पोलीस, SRP तुकड्या आणि रॅपिड force तैनात केले आहेत.
दरम्यान, जरांगे यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी समाजाकडून एक व्हॅनिटी वाहन घेण्यात आलं आहे, ज्यात जरांगे यांच्यासाठी झोपण्याची आणि प्रसंगी औषधोपचार करण्याची सोय असेल.
या आंदोलनाचा धसका घेत शासनही सावध पाऊल टाकत असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी तातडीची बैठक बोलावली आहे. कदाचित या बैठकीत काही तोडगाही निघू शकतो. पण या तोडग्या नंतर ही मराठा समाज आंदोलन थांबवेल असं चिन्ह दिसत नाही, कारण जरांगे यांनी अगोदरच जाहीर केलं आहे की, आरक्षण मिळालं तरी आणि नाही मिळालं तरी मुंबईला वारी करणारच.