Maharashtra Vidhan Sabha Election Best राज्यात 20 नोव्हेंबरला मतदान एकाच टप्यात मतदान घेण्यात येणार आहे

 झारखंड आणि आपल्या महाराष्ट्र राज्यातल्या विधानसभा निवडणुकासाठी आज निवडणूक आयोगाने तारीख जाहीर केली. राज्यात 20 नोव्हेंबरला मतदान एकाच टप्यात मतदान घेण्यात येणार आहे. तर 23 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागेल. एकदा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला की आचारसंहिताही  लागू होत असते, तिला आदर्श आचार संहिता असं म्हणतात इंग्रजीत त्यालाच मॉडेल कोड ऑफ कंडक्ट असेही म्हटले जाते. तर आचारसंहिता म्हणजे काय आणि आचारसंहिता लागू झाल्यानंतर नेमकं काय होत असतं?  या सगळ्या गोष्टींचा उहापोह आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत.

 

Maharashtra Vidhan Sabha Election

तर मंडळी विधानसभा निवडणुकीमुळे संपूर्ण राज्यात आचारसंहिता लागू होईल. आणि ती एकदा लागू झाली, की त्यानंतर मग निवडणूक आयोगाच्या काही गाईड लाईन्स, अर्थात मार्गदर्शक सूचना राज्य सरकारला आणि सर्वच पक्षांना पाळाव्या लागतात. आचारसंहिता एकदा लागू झाली की केंद्र सरकार किंवा राज्य सरकार अशावेळी त्या संबंधित राज्यासाठी नवीन घोषणा करू शकत नाही. तसंच एरवी पंतप्रधान आणि इतर मंत्र्यांच्या हातून होणारे विविध कामांचं उद्घाटन किंवा भूमिपूजन आचार संहितेच्या काळात करता येत नाही.  त्यासोबतच निवडणुकांच्या काळात कोणत्याही पक्षाला शासकीय यंत्रणांचा वापर करता येत नाही.
अगदी मुख्यमंत्री किंवा इतर मंत्र्यांना शासकीय वाहन, शासकीय विमान, किंवा शासनाच्या दालनवळण सेवा सुविधांचा वापर करता येत नाही. त्यासोबतच आचारसंहिता लागू होताच, शहरभरात लावले जाणारे विविध बॅनर्स, तसंच ज्या काही विविध पक्षांच्या, पाट्या असतात, किंवा चिन्ह असतं या सगळ्यांना झाकून टाकण्यात येतं, किंवा काढून टाकण्यात येत.  तसंच राजकीय पक्षांना त्यांच्या सभांसाठी, वेगवेगळ्या बैठकांसाठी तसेच प्रचार कार्यांसाठी निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागते. तसंच जात धर्म आणि धार्मिक प्रतिकांचा वापर राजकारणासाठी किंवा निवडणुकीसाठी, पक्षाच्या प्रचारासाठी, व्यक्तीच्या प्रचारासाठी करता येत नाही. त्यामुळे कोणत्याही नेत्यास उमेदवारास धार्मिक स्थळ अर्थात मंदिर, मस्जिदमधे जाता येत नाही.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024

तसंच मतदारांना कोणतेही आर्थिक प्रलोभन देता येत नाही. निवडणुका सुरू झाल्या की मतदारांना आकर्षित करण्यासाठी, अनेक साधनांचा वापर होत असतो. आपण खूपदा पाहतो, अनेक उमेदवार निवडणूक काळात पैसे वाटतात, काही गृह उपयोगी वस्तू, महिलांसाठी साड्या कुकर याच वाटप होतं असा आरोप होतो, त्यामुळे आचारसंहितेच्या काळात  मतदारांना कोणत्याही प्रकारचा प्रलोभण देता येत नाही. त्यासोबतच कोणत्याही उमेदवाराने त्याच्या विरोधी उमेदवाराच्या निवडणूक जाहीरनामा किंवा धोरणावर टीका करता  येईल मात्र, कोणत्याही उमेदवारावर तसेच त्याच्या कुटुंबियांवर वैयक्तिक हल्ला करता येत नाही. तसं करणं गुन्हा होतो.
यानंतर मतदान केंद्रावर आणण्यासाठी कोणत्याही पक्षाकडून किंवा व्यक्तीकडून मतदारांना गाडी किंवा खाजगी वाहन उपलब्ध करून देता येत नाही. तसंच त्यांना विशिष्ट पक्षाला मतदान करण्यासाठी धमकावता येणार नाही. नंतर आचार संहितेच्या काळात मतदान केंद्राच्या शंभर मिटर अंतरावर पक्षांचा प्रचार करता येणार नाही. दरम्यान, कोणत्याही उमेदवारास आपल्या विरोधी  उमेदवाराच्या प्रचार कार्यात अडथळा निर्माण करता येत नाही. तसंच एखाद्या पक्षाला स्वतःच्या नेत्याची किंवा पक्षाची सभा घ्यायची असेल तर त्यासाठी रीतसरपणे, स्थानिक पोलीस स्टेशन, किंवा स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी लागते जेणेकरून सभेचा वेळ ठिकाण आणि प्रवासाचा मार्ग या सगळ्या गोष्टींची त्यांना माहिती द्यावी लागते. तसंच नियोजित गोष्टी प्रशासनाला कळवले असतानाही, जर त्यात बदल करण्यात आला. तर अशावेळी आयोजकांवर गुन्हे देखील दाखल केले जाऊ शकतात.

राज्यात 20 नोव्हेंबरला मतदान एकाच टप्यात मतदान घेण्यात येणार आहे

तसेच मतदानाच्या 24 तास अगोदर कोणत्याही प्रकारच्या मद्य किंवा दारूचे वाटप करता येत नाही. त्यासोबतच सत्ताधारी पक्षाला शासकीय खर्चातून कोणत्याही प्रकारची पक्षाची जाहिरात, किंवा प्रचार करता येणार नाही. आणि निवडणुकीच्या काळात शासकीय माध्यमांचा वापरही सत्ताधारी पक्षाला करता येणार नाही. आचारसंहिता लागू झाल्यानंतर शासनाकडून कोणताही मंत्री कोणत्याही धनादेश किंवा आर्थिक मदतीची घोषणा करू शकत नाही किंवा त्याचा वाटपही करता येत नाही. तर या सगळ्या गोष्टी आचारसंहिता लागू झाल्यानंतर, शासनाला करता येत नाहीत, आणि असं करणं आचारसंहितेचे उल्लंघन मानलं जातं. त्यासोबतच शासकीय कर्मचारी निवडणूक काळात निवडणूक आयोगाचे कर्मचारी म्हणून कार्यरत असतात.
आणि आयोगाने दिलेल्या निर्देशानुसारच त्यांना काम करावं लागतं. आणि कुणी या आदर्श आचारसंहितेचे पालन करत नसेल, किंवा कुणाकडून उल्लंघन होत असेल तर अशावेळी त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई निवडणूक आयोगाकडून केली जाते.
संपूर्ण माहितीसाठी:- येथे क्लीक करा
तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ मधून आपण आचारसंहिता म्हणजे काय? आणि ती लागू झाल्यानंतर काय केलं पाहिजे काय केलं नाही पाहिजे या सगळ्या गोष्टींची आपण माहिती घेतली. आपणही एक जागरूक नागरिक म्हणून या गोष्टींची जाणीव ठेवून, आपली वागणूक ठरवली पाहिजे. खूपदा आपण आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचे पाहतो ऐकतो, अशावेळी पुढे येऊन त्या संदर्भात तक्रार केली पाहिजे. आणि आपल्या देशात निपक्षपणे या सार्वजनिक निवडणूक पार पडाव्यात, कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार होऊ नये, असं कार्य केलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे निवडणूक काळात शांततेसाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत.
आपल्या सगळ्यांना आगामी विधानसभेसाठी  एक मतदार, एक उमेदवार म्हणून खूप शुभेच्छा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *