Young Brigade of Sharad Pawar in this assembly ओल्ड पवारांचे यंग शिलेदार या विधानसभेला होणार आमदार ?
ओल्ड पवारांची यंग ब्रिगेड
Young Brigade of Sharad Pawar in this assembly
विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष आपले उमेदवार जाहीर करत आहेत त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात कोणत्या पक्षाचे दोन उमेदवार एकमेकांना विरोधात उभे राहतात याचे चित्र जवळपास स्पष्ट होत आहे . राष्ट्रवादीच्या फुटी नंतर राष्ट्रवादी काँग्रेसने 2019 ला लढवलेल्या आणि जिंकलेल्या मतदारसंघात सध्या दोन्ही राष्ट्रवादी आपले उमेदवार देत आहे त्यातच शरद पवार यांनी अनेक तरुण उमेदवारांना आपल्या पक्षाकडून संधी दिली आहे. त्याच तरुण उमेदवारांविरोधात महायुतीकडून देखील उमेदवार दिले जात आहेत. त्याचाच आढावा आपण आज आपण घेणार आहोत .
सुरुवात करूयात तासगाव विधानसभा मतदारसंघापासून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून दिवंगत नेते आर आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांना उमेदवारी दिली आहे तर महायुतीकडून सांगलीचे दोन वेळा खासदार राहिलेले संजय पाटील यांना अजित पवार यांच्या पक्षाने उमेदवारी दिली आहे. संजय पाटील यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले काँग्रेसचे विशाल पाटील यांनी संजय पाटलांना पराभूत केलं. हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे असल्यामुळे अजित पवार यांच्या पक्षानेही या मतदारसंघात संजय पाटलांना उमेदवारी दिली.
यानंतरचा मतदार संघ म्हणजे कारंजा विधानसभा शरद पवार यांच्या पक्षाने ज्ञायक पाटणी यांना उमेदवारी दिली आहे. भाजप महायुतीने या मतदारसंघात आपला उमेदवार जाहीर केला आहे सईताई डहाके यांना इथून महायुतीची उमेदवारी जाहीर झाली आहे. डहाके यांनी मागच्या काही काळापासून या मतदारसंघात लढण्याची तयारी केली आहे .
मंडळी यानंतर सर्वात चर्चेत असणारा मतदारसंघ म्हणजे बारामती विधानसभा मतदारसंघ शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने युगेंद्र पवार यांना इथली उमेदवारी दिली आहे तर महायुतीचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार हे या मतदारसंघात उमेदवार आहेत त्यामुळे या हाय व्होल्टेज लढतीकडे सर्व राज्याचं लक्ष लागलेलं आहे अजित पवार विद्यमान उपमुख्यमंत्री आहेत तसेच या मतदारसंघातून ते आजपर्यंत सात वेळा निवडून आले आहेत ,त्यामुळे अजित पवार यांच्या विरोधात असणारे नवखे युगेंद्र पवार हे अजित पवार विरोधात कसं लढतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. युगेंद्र पवार हे शरद पवारांचे उमेदवार असल्यामुळे अजित पवारांना यावेळी आव्हान कठीण असल्याचे सांगितलं जात आहे.
मंडळी यानंतर अकोले विधानसभा मतदारसंघासाठी शरद चंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीने अमित भांगरे यांना उमेदवारी दिली आहे त्यांच्या विरोधात अजित पवार यांचा राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार किरण लाहमटे हे उमेदवार आहेत. लहामटे विद्यमान आमदार असल्यामुळे तसंच अजित पवार यांच्या पक्षात असल्यामुळे मतदारसंघावर त्यांचं चांगलं वर्चस्व आहे मात्र राष्ट्रवादीच्या फुटी नंतर लहामटे यांनी अजित पवारांची साथ दिल्यामुळे शरद पवारांनी अमित भांगरे यांना इथली उमेदवारी दिली आहे.
Young Candidate This legislative assembly
यानंतर आहील्या नगर जिल्ह्यातल्या कर्जत जामखेड मतदारसंघांमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून विद्यमान आमदार रोहित पवार यांना उमेदवारी दिली आहे तर महायुतीकडून त्यांच्या विरोधात माजी आमदार राम शिंदे हे भाजपचे उमेदवार असणार आहेत 2019 ला झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये रोहित पवार यांनी राम शिंदे यांचा पराभव केला होता त्यामुळे ही यंदाची लढत देखील महत्त्वाची असणार आहे. महायुती कडून भाजप ,शिवसेना शिवाय अजित पवार यांची राष्ट्रवादी देखील राम शिंदे यांना या मतदारसंघात पाठिंबा देईल अशी शक्यता व्यक्त होते आहे.
यानंतर बीड विधानसभा मतदारसंघाबद्दल आपण जाणून घेणार आहोत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून संदीप क्षीरसागर यांना इथली उमेदवारी दिली आहे. क्षीरसागर हे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत तर महायुतीकडून अद्याप उमेदवार जाहीर झाला नसला तरी महायुतीकडून अनेक नेते या मतदारसंघासाठी इच्छुक आहेत त्यातच योगेश क्षीरसागर यांच्या नावाची चर्चा महायुतीकडून होते आहे. राष्ट्रवादी फुटी नंतर संदीप क्षीरसागर यांनी शरद पवार यांची साथ दिली होती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बीड लोकसभा निवडणुकी वेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांना बीडमधून महत्त्वाची लीड मिळवून देण्यात संदीप क्षीरसागर यांची भूमिका महत्त्वाची होती तसेच या मतदारसंघातून नुकतच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणाऱ्या ज्योती मेटे यादेखील इच्छुक होत्या. बीडमध्ये मराठा आरक्षणाचे आंदोलन करते मनोज जरांगे पाटील यांचा सर्वाधिक प्रभाव असल्यामुळे
भाजप जिल्हा अध्यक्ष पदाचा राजीनामा देणारे म्हस्के हे देखील या मतदारसंघातून इच्छुक होते मात्र ऐनवेळी पुन्हा एकदा शरद पवारांनी संदीप क्षीरसागर यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी जाहीर केले. आता या मतदारसंघात बंडखोरी पाहायला मिळते की महायुतीकडून नेमकं कोणाला उमेदवार केलं जातं यावर इथलं राजकारण ठरणार आहे.
यानंतर आष्टी या बीड जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार यांच्या पक्षाने मेहबूब शेख यांना उमेदवारी दिली आहे शेख हे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष आहेत. महबूब शेख यांनी बीड लोकसभा निवडणुकी वेळी महत्त्वाची भूमिका बजावली होती तर महायुतीकडून मेहबूब शेख यांच्या विरोधात अद्याप भाजपकडून सुरेश धस यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे यामुळे इथली लढत रंगतदार होईल.
यानंतर अहिल्यानगर विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून अभिषेक कळमकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे या मतदारसंघात विद्यमान आमदार हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे संग्राम जगताप आहेत. जगताप यांनी राष्ट्रवादी फुटी नंतर अजित पवार यांची साथ दिली त्यामुळे शरद पवार यांनी या मतदारसंघात कळमकर यांच्यासारख्या युवा नेत्याला यंदाच्या विधानसभेला संधी दिली आहे.
यानंतरचा मतदार संघ म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातला राहुरी विधानसभा मतदारसंघ. इथले विद्यमान आमदार आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्राजक्त तनपुरे त्यामुळे पुन्हा एकदा शरदचंद्र पवार पक्षाकडून तनपुरे यांनाच इथली उमेदवारी मिळाली आहे तर महायुतीकडून त्यांच्या विरोधात माजी आमदार शिवाजीराव कर्डिले हे भाजपचे उमेदवार आहेत त्यामुळे इथली लढत महत्त्वाची असणार आहे. कर्डिले यांना राजकारणातला दीर्घ अनुभव आहे तर प्राजक्ता तनपुरे हे दुसऱ्यांदा या मतदारसंघातून आपलं नशीब आजमावणार आहेत.
हेही वाचा : – सत्तेसाठी महाराष्ट्र विकायला काढला ?
यानंतरचा मतदारसंघ म्हणजे पंढरपूर विधानसभा मतदारसंघ शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून युवा नेते भगीरथ भालके यांना इथली उमेदवारी जाहीर होईल अशी शक्यता होती पण ऐनवेळी ही जागा कॉंग्रेसने आपल्याकडे घेतली आहे आणि भालके यांना उमेदवारी दिली आहे ,तर महायुतीकडून भालके यांच्या विरोधात विद्यमान आमदार समाधान अवताडे हेच असणार आहेत. भगीरथ भालके यांचे वडील भारत भालके या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेले होते. मात्र त्यांच्या निधनानंतर समाधान आवताडे यांनी पोटनिवडणुकीत या मतदारसंघात विजय मिळवला होता. त्यामुळे पुन्हा एकदा भालके विरुद्ध अवताडे अशी लढाई इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे.
यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाकडून समरजीत सिंह घाडगे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे तर महायुतीकडून या मतदारसंघात विद्यमान आमदार हसन मुश्रीफ यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. मुश्रीफ हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आणि मंत्री आहेत घाडगे हे पूर्वी भाजपमध्ये होते मात्र हा मतदारसंघ महायुतीकडून हसन मुश्रीफ हेच लढवणार हे जाहीर झाल्यानंतर घाडगे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी प्रवेश केला. त्यामुळे हा मतदारसंघ देखील महत्त्वाचा असून चर्चेत आला आहे.
मंडळी यानंतरचा मतदार संघ म्हणजे जळगाव जिल्ह्यातला मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पक्ष पवार यांच्या पक्षाकडून रोहिणी खडसे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे तर महायुतीकडून शिवसेना शिंदे पक्षाचे चंद्रकांत पाटील हे उमेदवार आहेत रोहिणी खडसे या एकनाथ खडसे यांच्या कन्या आहेत त्यामुळे खडसे यांचा स्टॅन्ड या निवडणुकीत कसा राहतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
मंडळी यानंतर नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर या मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उदय सांगळे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर महायुतीकडून अजित पवार पक्षाचे माणिकराव कोकाटे हे उमेदवार आहेत कोकाटे विद्यमान आमदार असल्यामुळे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना मतदारसंघात बांधून ठेवण्यात त्यांनी यश मिळवल आहे. तसंच कोकाटे यांना मतदार संघाची जाण असल्यामुळे हा मतदारसंघ लढण्यासाठी त्यांना सोपा जाईल असं सांगितलं जात आहे मात्र, मात्र ऐनवेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने सांगळे यांना उमेदवारी दिल्यामुळे ही लढत पुन्हा एकदा चुरशीची होईल असं सांगितलं जात आहे.
मंडळी यानंतर विक्रमगड या विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून सुनील भुसारा यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे तर महायुतीकडून हरिश्चंद्र भोय हे भाजपचे उमेदवार असणार आहेत. यानंतरचा मतदार संघ म्हणजे जुन्नर विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघासाठी शरद चंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सत्यशील शेरकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे, तर महायुतीकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादी कडून अतुल बेनके हेच उमेदवार असणार आहेत. त्यामुळे ही लढत देखील कशा पद्धतीने होते हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे राष्ट्रवादी फुटी नंतर बेनके यांनी अजित पवारांची साथ दिली त्यामुळे शरद पवारांच्या मनात बेनके यांच्या विषयी नाराज असल्याचे सांगितलं जातंय त्यातच सत्यशील शेरकर यांच्यासारखा महत्त्वाचा उमेदवार शरद पवारांनी मैदानात उतरल्यामुळे अतुल बेनके यांच्यासाठी यंदाची विधानसभा आव्हानात्मक असणार आहे.
तर मंडळी हे काही तरुण उमेदवार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उतरवले आहेत. या तरुण विरुद्ध विद्यमान आमदारांविरुद्ध होणारे या लढाईत कोण जिंकेल असं आपल्याला वाटतं