beed vidhansabha sharad pawar -पवारांची विधानसभेची तयारी बीड जिल्ह्यात तुतारीसाठी रांग दारी
कुठुन कोणाला उमेदवारी ?
मागच्या काही काळापासून राज्यात पक्षांतराच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. विधानसभेच्या तोंडावर इच्छुकांची संख्या पाहता. सुरक्षित मतदार संघासोबतच सुरक्षित पक्षाची निवड करताना अनेक नेते दिसत आहेत. कोल्हापुरात भाजपनेते समर्जीत घाडगे, अलीकडेच इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटी नंतर अनेक नेते अजित पवारांसोबत गेले. त्या नेत्यांपैकी अनेक नेते पुन्हा एकदा पवार यांच्याकडे परतू पाहत आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीने चांगले यश मिळवलं. त्यातच अजित पवार यांनी पक्ष फोडल्यामुळे शरद पवार यांच्या विषयी निर्माण झालेली सहानुभूती, त्यातून त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभेला चांगले यश मिळवलं. कदाचित त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षांकडे जाणाऱ्या नेत्यांचा ओघ वाढला आहे. आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांच्याकडे मुलाखत देण्यासाठी अनेक नेत्यांनी गर्दी केली. हे नेते विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत. असेच काही नेते बीड जिल्ह्यामध्ये आहेत, त्याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. असे कोणते नेते आहेत ज्यांनी कोणत्या विधानसभा मतदारसंघातून लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे, हे आपण बघणार आहोत. विशेषता बीड जिल्ह्यातल्या विधानसभा लढण्यासाठी, ज्या नेत्यांनी शरद पवार यांच्याकडे मुलाखती दिल्या. आणि हे नेते सर्वपक्षीय आहेत. बीड जिल्ह्यातल्या सहा विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांच्या नुकत्याच पुणे येथे मुलाखती पार पडल्या. मतदारसंघातील संसदीय मंडळाची बूथरचना, निवडणुकीसाठीची बलस्थाने, आणि इच्छुक नेत्याची राजकीय कारकीर्द याचा आढावा या मुलाखतीत घेण्यात आला. विशेष म्हणजे या नेत्यांमध्ये ज्येष्ठापासून अगदी युवा वर्ग देखील मोठा होता.
पहिला मतदारसंघ आपण पाहू आष्टी मतदारसंघ
बीड जिल्ह्यातल्या आष्टी मतदार संघातून तुतारी हाती घेण्यासाठी, अनेक नेते इच्छुक आहेत. जवळपास डझनभर नेत्यांनी शरद पवार यांच्याकडे मुलाखत दिली. ज्यामध्ये राम खाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, सुशीला मोराळे, नरसिंग जाधव, साहेबराव दरेकर, उद्धव दरेकर, सतीश शिंदे, अण्णासाहेब चौधरी, बापूसाहेब डोके, प्रदीप चव्हाण, अमोल तरटे या नेत्यांनी पवार यांच्याकडे मुलाखती दिल्या.
यानंतरचा मतदार संघ आहे माजलगाव मतदारसंघ
माजलगाव मतदासंघांतुन राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी राजकीय संन्यास जाहीर केल्यानंतर त्यांचे राजकीय वारसदार म्हणून त्यांचे पुतणे जयसिंह सोळंके हेच महायुतीचे येथे उमेदवार असतील असे बोलले जात आहे तसेच या मतदारसंघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असेल या चर्चा काही दिवसापासून सुरू आहेत.माजलगाव विधानसभा मतदारसंघासाठी. भाजप नेते मोहन जगताप यांनीही मुलाखत दिल्याचे बोललं जात आहे, त्यानंतर नारायण डक, शेख मंजूर, राधाकृष्ण होके, मनोहर डाके, गंगा भीषण थावरे आदी नेत्यांनी मुलाखती दिल्या आहेत यामुळे ही नावे चर्चेत आहेत.
यानंतर सर्वात महत्वाचा आणि चर्चेत असणारा मतदारसंघ म्हणजे बीड मतदार संघ
या मतदारसंघासाठी विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांनाच उमेदवारी निश्चित मानली जाते. असं असलं तरी या मतदारसंघातून सर्वात आघाडीवर असणारे व चर्चित असणारे नाव म्हणजे भागवत तावरे तावरे यांना सर्व जनता लोकपत्रकार म्हणून ओळखते त्यामुळे ते क्षीरसागर यांच्यानंतर प्रबळ दावेदार मानले जातात. याबरोबरच इथून जाधव, दराडे गोरे यांनीही मुलाखती दिल्या.
यानंतरअनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या केज विधानसभा मतदारसंघ
या मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून इच्छुक असणाऱ्या नेत्यांमध्ये. भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी पवार यांच्याकडे उमेदवारी मागितली आहे. मागच्या बऱ्याच दिवसांपासून त्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या संपर्कात होत्या. त्याशिवाय अंजली घाडगे तसेच मतदार संघाचे माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी देखील पवार यांच्याकडे मुलाखत दिल्याचे सांगितलं जात आहे.
यानंतर कृषिमंत्री असणारे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांचा मतदारसंघ असणारा परळी मतदारसंघ
या विधानसभेसाठी अनेक नेत्यांनी मुलाखती दिल्या. या मतदारसंघात शरद पवार यांनी व्यक्तिगत लक्ष घातल्याचे सांगितलं जात आहे. त्यामुळे स्ट्रॉंग कॅंडिडेट इथे पवार यांच्याकडून दिला जाईल असं सांगितलं जात आहे. अलीकडेच परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेडचे आमदार गुट्टे यांचे जावई राजाभाऊ फड, सुधामती गुट्टे यांच्याही नावाची मतदारसंघात चर्चा झाली. तसंच फुलचंद कराड यांनी देखील पवार यांच्याकडे मुलाखत दिल्याचे सांगितलं जात आहे.
यानंतर गेवराई मतदारसंघ
या मतदारसंघातून देखील अनेक नेते पवार यांच्या राष्ट्रवादी कडून लढण्यासाठी इच्छुक आहेत. नेमकी उमेदवारी कुणाला मिळते याबद्दल कुतूहल असणार आहे. मात्र, पूजा मोरे, अण्णासाहेब राठोड यांच्यासह अनेकांनी मुलाखती दिल्या. या मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते माजी आमदार बदामराव पंडित हे देखील इच्छुक आहेत. गेवराईच्या जागेसाठी महाविकास आघाडीमध्ये जोरदार रस्सीखेच चालू असल्याचे आपल्याला माध्यमाच्या माहितीनुसार समजते आहे मात्र याच्यात कोणाला यश मिळतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे जर लक्ष्मण पवारांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश करून तुतारीवर लढण्याची तयारी दाखवली तर शरद पवार या जागेसाठी जोर लावून धरू शकतात.
लोकसभा निवडणुकीला मनोज जरांगे पाटील यांचा फॅक्टर जोरदार चालला. तसेच बीड जिल्ह्यात मराठा विरुद्ध ओबीसी अशा पद्धतीचे वातावरण देखील निर्माण झालं होतं. . विधानसभा निवडणुकीतही मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत राहील असे सांगितले जात आहे. त्यामुळेच शरद पवार यांच्या पक्षासाठी विद्यमान खासदार असल्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाची ताकद पाहायला मिळू शकते, याचाच अंदाज घेऊन या नेत्यांनी विधानसभा लढवण्याची इच्छा पवार यांच्याकडे व्यक्त केल्याचे सांगितलं जात आहे. असं असलं तरी इच्छुकांची गर्दी पाहता, पवार नेमके कुणाला उमेदवारी देतात. तसेच उमेदवार निवडताना निकष काय ठेवतात, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.