Devendra Fadnavis on Baba Siddique या 10 कारणांमुळे फडणवीस गृहमंत्री म्हणून अपयशी ठरतात ?

Devendra Fadnavis on Baba Siddique

राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची 12 ऑक्टोबर रोजी मुंबईत हत्या करण्यात आली. संध्याकाळी सुमारे आठ वाजता तीन जणांनी सिद्दिकी यांचे पुत्र आमदार जीशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार केला. सिद्धीकी यांना राज्य सरकारने वाय दर्जाची सुरक्षा दिली होती, मात्र असं असतानाही त्यांच्यावर गोळीबार झाला. पुढे काही वेळातच त्यांना मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या घटनेनंतर राज्याच्या राजकारणात आणि सर्वसामान्य लोकांमध्ये अनेक प्रतिक्रिया उमटल्या. तीन पैकी दोन आरोपींना पोलिसांनी पकडण्यात यश मिळवला आहे, एक आरोपी अद्याप फरार आहे,या हत्या प्रकरणाचा पोलीस अधिकारी दया नायक हे तपास करत आहेत.

Devendra Fadnavis on Baba Siddique

या हत्यामागे अंडरवर्ल्डचा हात आहे का? ही हत्या बिस्नोई गँग केली आहे का? की या हत्ती मागे काही आर्थिक गैरव्यवहार आहेत? असे अनेक प्रश्न आजच्या घडीला उपस्थित होत आहेत. मात्र महाराष्ट्रात वाढणार गुन्हाच प्रमाण आणि मागच्या काळात घडलेले काही गुन्हे, याचा जर आपण लेखाजोखा घेतला. तर बिहार राज्याला लाजवणारे गुन्हे आपल्या महाराष्ट्रात घडत आहेत, असं म्हटलं तरी हरकत नाही.
मागच्या आठ दहा महिन्याच्या घटनांचा विचार केल्यास महाराष्ट्रात राजकीय हत्या होण्याचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचा पुत्र माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची मुंबई झालेली हत्या, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे ठाण्यातले तालुकाध्यक्ष यांची अलीकडे झालेली हत्या. भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस चौकीत शिंदे गटाच्या नगरसेवकावर केलेला गोळीबार, अभिनेता सलमान खान याच्या घरावर झालेला गोळीबार, त्यातून समोर आलेलं अंडरवर्ल्ड कनेक्शन. अजित पवार पक्षाचे पुण्याचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची झालेली अलीकडचे हत्या. अशा कितीतरी घटना मागच्या काही काळात महाराष्ट्रात घडल्या. याशिवाय बदलापूर बाललैंगिक अत्याचार प्रकरण, पुण्यात शाळकरी मुलींवर रिक्षा चालकाने केलेला अत्याचार. असे महिलांवरचे अत्याचाराचे गुन्हे, आणि कितीतरी खून, चोऱ्या, मारामारी दरोडे, लुटमार या घटनांची मोठी यादी होईल. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाचा विचार केल्यास महाराष्ट्रातल्या पोलिसांवर गृह खात्याचा वचक राहिला नाही का? असेही प्रश्न आता जनसामान्याकडून उपस्थित होत आहेत. सिद्दिकी यांची झालेली हत्या, या घटनेची नैतिक जबाबदारी म्हणून गृहमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अलीकडेच केली. तसेच महाविकास आघाडीने देखील, फडणवीस यांच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करत, त्यांच्यावर टीका केली आहे. एरवी भाजप नेत्यांचे शिवाय महायुतीच्या नेत्यांचे गुन्हे दाबण्याचे काम गृह खात करत असून, फडणवीस यांचं त्यांना अभय आहे अशी गाडीच्या नेत्यांनी केली. अलीकडेच भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुस्लिम विरोधी केलेलं चिथावणीखोर वक्तव्य . त्यावरूनही राज्यभरात मोठे पडसाद पाहायला मिळाले. तेव्हा राणे यांचं वक्तव्य चांगलंच गाजलं होत. सागर बंगल्यावर आपला बॉस बसलेला आहे, त्यामुळे तुम्हाला जे करायचं ते करा असं ते वक्तव्य होतं. शिंदे गटाचे बुलढाणा जिल्ह्यातले आमदार संजय गायकवाड यांचे राहुल गांधी यांच्या विरोधातला वक्तव्य, त्यामुळे देखील महाराष्ट्रात मोठ्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

भाजप कश्याच्या जिवावर मराठ्यांना हलक्यात घेतय

यावरून या बेलगाम नेत्यांना फडणवीस यांच अभय आहे का असेही प्रश्न उपस्थित झाले. महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर, महायुतीचे सरकार राज्यात आलं, तेव्हा उपमुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांनी अनेक खात्यांचा कारभार आपल्या हाती घेतला. गृहमंत्री ऊर्जामंत्री, असे 4 ते 5 खाती त्यांच्याकडे आज आहेत. शिवाय 2014 ला पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस यांनी गृह खातं पाच वर्ष आपल्याकडेच ठेवलं होतं. यावरून फडणवीसंना गृहखात आवडीच आहे, असा अंदाज लावता येऊ शकतो. मध्यंतरी अंतरवाली सराटी इथं उपोषणाला बसलेल्या शेकडो, पुरुष आणि महिलांवर पोलिसांनी लाठी हल्ला केला होता. या घटनेचे पडसाद अवघ्या राज्यात उमटले होते. तेंव्हा देखील देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. फडणवीस यांच्या परवानगीशिवाय पोलिसांनी लाठीचार्ज केला नसावा, त्यामुळे या लाठी चार्जच्या मागे फडणवीस आहेत, असे आरोप विरोधकांनी केली होते. तेव्हाही त्यांच्या राजीनामाची मागणी करण्यात आली होती. याशिवाय मागच्या काळात घडलेल्या काही घटनाचा आपण एक आढावा घेऊयात.
2023 मध्ये पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचार घेत असलेला ड्रग्स तस्करी प्रकरणातला आरोपी, ललित पाटील रुग्णालयातून फरार झाला होता. तेव्हा या सगळ्या प्रकरणामागे अर्थात त्याला रुग्णालयातून फरार होऊन देण्यात, काही . राजकीय नेते आणि पोलिस अधिकाऱ्यांनी त्याला मदत केल्याचेही आरोप त्याकाळी झाले. तेव्हा हे प्रकरण राज्यभरात मोठ्या प्रमाणात गाजलं होतं. तेव्हा देखील फडणवीस यांच्यावर आणि गृह खात्यावर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. त्यानंतर फेब्रुवारी 2023 मध्ये रत्नागिरी जिल्ह्यात पत्रकार शशिकांत वारिसे यांची हत्या करण्यात आली होती. सुरुवातीला अपघाताचा बनाव करणारी ही घटना, नंतर खून असल्याचे स्पष्ट करणारी ठरली. रत्नागिरीतल्या नाणार रिफायनरी प्रकल्प बाबत वारिसे यांनी एक पोस्ट सोशल मीडियात शेअर केली होती. त्या पोस्टमध्ये पंतप्रधान मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या बॅनर सोबत गंभीर गुन्हातील आरोपीचा फोटो होता. दुसऱ्या दिवशी सकाळी वारिस यांच्या गाडीचा अपघात झाला, आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. असं पुढे स्पष्ट झालं. तेव्हाही रत्नागिरी जिल्ह्यातले अनेक पत्रकारांनी हा राजकीय खून असल्याचे आरोप केले होते. तर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी फडणवीस यांच्या गृह खात्यावर टीका करत फडणवीस यांच्या राजीनामाची मागणी केली होती.

यानंतर मार्च महिन्यात छत्रपती संभाजी नगर येथे झालेली दंगल. पोलिसांच्या माहितीनुसार सुरुवातीला दोन गटात झालेल्या चकमकीनंतर बंदोबस्तासाठी तैनात असणाऱ्या पोलिसांच्या 10 पेक्षा जास्त वाहनांना अज्ञातांनी आग लावून दिली होती. तेव्हा देखील या प्रकरणावरून गृह खात्यावर प्रश्न उपस्थित झाले. जालना शहरातील तरुण गजानन तौर याची झालेली हत्या, यानंतर पुढे पुणे जिल्ह्यातल्या आळंदी इथं संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यावर वारकऱ्यांवर झालेला लाठीचार्ज. या प्रकरणावरून राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. तेव्हाही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी फडणवीस आणि राज्य सरकारला टार्गेट केलं होतं. त्यानंतर अलीकडेच कोल्हापूर जिल्ह्यातल्या विशालगड परिसरात झालेली घरांची आणि धार्मिक स्थळांची मोडतोड. अतिक्रमण करून विशाळगड परिसरात एक धार्मिक प्रार्थना स्थळ बांधण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर तिथल्या हिंदुत्ववादी संघटनांनी या धार्मिक स्थळांची आणि परिसरातल्या घरांची मोडतोड केली. तेव्हा देखील या घटनेचे राजकीय पडसाद राज्यभरात उमटले होते. अनेक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करत, या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला होता. त्यानंतर पुण्यातल्या कोथरूड इथं झालेली शरद मोहोळ याची हत्या. त्यानंतरही फडणवीसांवर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते.

याशिवाय जळगाव मध्ये किशोर पाटील यांनी पत्रकाराला केलेली मारहाण, शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी अधिकाऱ्याला केलेली मारहाण, आमदार गीता जैन यांनी अधिकाऱ्याला केलेली मारहाण, शिवसेनेचे आमदार सदा सरवनकर यांनी हवेत केलेला गोळीबार, आमदार प्रकाश सुर्वे यांची व्हायरल झालेली क्लिप, स्पर्धा परीक्षेतून राज्यातून टॉप आलेल्या दर्शना पवार यांची झालेली हत्या अशा कितीतरी घटना महाराष्ट्रात मागच्या काही काळात घडल्या आहेत. राज्यात विधानसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत, त्यामुळे कोणत्याही क्षणी आचारसंहिता देखील लागू शकते. शासनाचा कार्यकाळ हा एक महिन्यापेक्षा कमी राहिलेला आहे. असं असतानाही कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी, योग्य प्रकारे न हाताळता आल्यामुळे फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे, बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणाचे राजकीय पडसाद देखील मोठ्या प्रमाणात उमटत आहेत, निश्चितच या हत्या प्रकरणावरून महाराष्ट्रात राजकारण तापण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र फडणवीस यांच्या गृहमंत्री पदाच्या या कार्यकाळात जे काही गुन्हे आजपर्यंत झालेले आहेत, त्याची नैतिक जबाबदारी म्हणून फडणवीस राजीनामा देतील का ?  याबद्दल तुम्हाला काय वाटतं  ?

https://marathi.abplive.com/elections/many-disgruntled-and-interested-candidates-met-deputy-chief-minister-devendra-fadnavis-vidhansabha-election-political-news-1321086

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *