विधानसभा निवडणुकीत आमच्यासाठी ‘जरांगे फॅक्टर’ वजा, आंबेडकर यांचे वक्तव्य, Maharashtra Assembly Election Best

Maharashtra Assembly Election

सध्या काँग्रेस-भाजप एकत्र काम करत असल्याची माहिती असून हरियाणा निवडणुकीवरून उलटसुलट चर्चा सुरू आहे. काँग्रेस आणि भाजप यांच्यात सामंजस्य झाल्याचा तिथल्या दलित समाजाचा आरोप आहे. वक्फ बिलामध्ये भाजपने हस्तक्षेप केल्यावरुन संघर्ष होणार होता. तो आता होणार नाही, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केला. एका म्यानात दोन तलवारी राहत नाहीत. त्यामुळे जरांगे फॅक्टर आम्ही पूर्वीच वजा केला आहे. आरक्षणावर आमच्या दोन वेगळ्या बाजू असून ओबीसींची मागणी कायदेशीर आणि घटनात्मक आहे, असे आंबेडकर म्हणाले.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत आगामी राजकीय वाटचाल स्पष्ट केली. ‘काँग्रेस नेत्यांचे खटले पतियाळा न्यायालयात प्रलंबित आहेत. त्यामुळे काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये सामंजस्य झाले आहे, असे हरियाणातील दलित समाजाने सांगितले. काँग्रेसने दलित कार्यकर्त्यांचा अपमान करायला सुरुवात केली आहे. काँग्रेसला मतदान करायचे ज्यांनी ठरवले तेथील ५० टक्के लोक भाजपसोबत गेले म्हणून भाजप जिंकली आहे. काँग्रेस आणि भाजपमध्ये जवळीक वाढली असून आरक्षणासंदर्भात दोन्ही पक्षांची एकच भूमिका आहे. त्यामुळे काँग्रेस बेभरवशाची झाली आहे. यांच्या नेत्यांची प्रकरणे बाहेर येऊ नये, म्हणून काँग्रेसने हरियाणा दान केले’, असा आरोप आंबेडकर यांनी केला.
केंद्रीय मंत्री किरेण रिजिजू यांनी छत्रपती संभाजीनगर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राहिलेल्या वास्तूचे राष्ट्रीय राष्ट्रीय स्मारक करण्याचे वक्तव्य केले आहे. सध्या बाबासाहेबांच्या नवीन स्मारकाची गरज नाही, असे आंबेडकर म्हणाले. राज्यात आम्ही आदिवासी संघटना, ओबीसी नेत्यांची एकजूट करीत आहोत. त्यात ९० टक्के यश आले असून किती जागा लढवणार थोड्याच दिवसात कळेल असेही त्यांनी सांगितले.

—जरांगे फॅक्टर मायनस
एका म्यानात दोन तलवारी राहत नाहीत. त्यामुळे जरांगे फॅक्टर आम्ही पूर्वीच वजा केला आहे. आरक्षणावर आमच्या दोन वेगळ्या बाजू असून ओबीसींची मागणी कायदेशीर आणि घटनात्मक आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या मागे असल्याचे आंबेडकर म्हणाले. राज्याने १७ जातींच्या शिफारशी दिल्या. याचा अर्थ ते मिळाले असा होत नाही असेही आंबेडकर म्हणाले. मनोज जरांगे मैदानात उतरले असते तर वेगळे चित्र दिसले असते. त्यासाठी वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांनी जरांगे यांची गोपनीय भेट घेत चर्चा केली. मात्र, समाजाच्या विचाराने आपण निर्णय घेणार असल्याचे जरांगे यांनी जाहीर केले. त्यामुळे अनेकांची अडचण वाढली आहे. या पार्श्वभूमीवर आंबेडकर यांनी जरांगे फॅक्टर वजा केल्याचे वक्तव्य केले आहे.

—-मनोज जरांगे मैदानात ?
आम्हीच एक आघाडी करत आहोत. तिसऱ्या आघाडीवर काय बोलणार असा सवाल करीत त्यांनी संभाजीनगरमध्ये गफ्फार कादरी येणार नाही. कारण आमच्याकडे जागा नाही. जरांगे पाटील म्हणतात आम्ही निवडणूक लढवू. पण ते लढतात की नाही माहिती नाही. त्यांनी दंड थोपटले याचा अर्थ ते मैदानात आहेत असे होत नाही. आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर असल्याने मराठा ओबीसीला मतदान देणार नाही आणि ओबीसी मराठ्याला मतदान देणार नाही. राज्यात राजकीय सद्यस्थिती अशी आहे, असे आंबेडकर म्हणाले.

—-ईव्हीएमला आमचा विरोध

आम्ही मुस्लिम पक्षाला घेऊन राजकारण करावे असा मानस होता. पण लक्षात आले की हे फार काळ टिकणार नाही. पक्षात ओबीसी नेतृत्व असून त्यांचा सूर होता मुस्लिम संघटनांशी बोलण्यापेक्षा आपण मुस्लिम समाजाशी जमवून घेत आहोत. इव्हिएमला माझा विरोध असून मतदान बॅलेटवर झाले पाहिजे, अशी मागणी आंबेडकर यांनी केली.

Maharashtra Vidhan Sabha Election Best राज्यात 20 नोव्हेंबरला मतदान एकाच टप्यात मतदान घेण्यात येणार आहे

—-भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव गट आरक्षणविरोधी

भाजप आरक्षणविरोधी आहेच. मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उध्दव गट पण त्याच विचारांवर गेला आहे. सत्तेत आलो तर मर्यादा वाढवू, असे काँग्रेस म्हणत आहे. मात्र जिथे सत्तेत आहेत तिथे का वाढवत नाही ? असा सवाल आंबेडकर यांनी केला. उध्दव ठाकरे काँग्रेससोबत गेले. त्यामुळे आता आम्ही त्यांच्यासोबत जात नाही आणि ते आले तरी घेणार नाही. मराठा खानावळ असते तशी मराठा पार्ट्या आहेत. आयाराम गयाराम मराठा पार्टीमध्ये होते, आहेत. त्यांच्यातीलच नेते इकडे-तिकडे होतात. बच्चू कडू आणि इतर त्याचा भाग असल्याचेही आंबेडकर म्हणाले.वंचित बहुजन आघाडीने स्बवळावर लढण्याची घोषणा केली आहे. पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या तीन द्या प्रसिद्ध केल्या आहेत. राज्यभरातील ४० पेक्षा जास्त उमेदवार जाहीर करीत वंचितने आघाडी घेतली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीसह परिवर्तन महाशक्ती, मनसे या पक्षांची चाचपणी सुरू आहे. आंबेडकर यांनी राज्यभरात दौरा करुन उमेदवारांशी संवाद साधला आहे. पक्षाने उमेदवार जाहीर करुन तूर्तास प्रचारात आघाडी घेतली आहे. मेळावे आणि बैठकांमधून पक्ष पदाधिकारी मतदारांपर्यंत पोहचण्याचे नियोजन करीत आहेत. मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्र या भागातील सर्वाधिक उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. इतर याद्या लवकरच प्रसिद्ध होतील, अशी माहिती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

https://newstapu.com/maratyanchi-vari-mumbai/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *