Maharashtra Assembly Election 2024 Georai गेवराईमध्ये लक्ष्मण पवार अपक्ष लढणार की दोन्ही पंडितांना नडणार ?
गेवराईमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून बदामराव पंडित यांना उमेदवारी जाहीर
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वच पक्ष अलर्ट मोडवर आहेत. त्यामुळे प्रत्येक विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित करताना हे पक्ष दिसत आहेत. मतदारसंघातील विद्यमान आमदार, त्यांच असणारं वर्चस्व. विरोधी पक्षाचा उमेदवार, स्थानिक समीकरण या गोष्टींचा विचार तर होत आहेच, शिवाय विद्यमान आमदारा विरोधात नाराजी, या सगळ्या गोष्टींचा विचार करत नेत्यांची तिकीट फायनल होत असतात. महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन पातळीवर हेच स्वरूप आहे. तसंच वंचित बहुजन आघाडी, आणि नुकत्याच स्थापन झालेल्या तिसऱ्या आघाडीच आव्हान देखील यंदाच्या विधानसभेला असणार आहेत. आज आपण बीड जिल्ह्यातल्या गेवराई विधानसभा मतदारसंघा बद्दल जाणून घेणार आहोत.
या मतदार संघात मराठा विरुद्ध ओबीसी असं वातावरण
तसं पाहिलं तर बीड मधला हा अतिशय महत्त्वाचा मतदारसंघ. या मतदारसंघावर आजवर पंडित घराणं आणि पवार घरान्याने सत्ता गाजवली आहे. या मतदार संघाचे विद्यमान आमदार आहेत भाजपचे लक्ष्मण पवार, लक्ष्मण पवार हे गेली दोन टर्म पासून या मतदारसंघातून निवडून येत आहेत. त्यामुळे त्यांचा असणारा अनुभव आणि सत्ताधारी पक्षाचा आमदार असल्यामुळे अनेक गोष्टी, विकास काम ते मतदार संघामध्ये करू शकेल. यंदाच्या विधानसभेला मात्र महायुतीसमोर मराठा आंदोलनाच आव्हान असणार आहे. कारण लोकसभा निवडणुकीमध्ये बीड जिल्ह्यात ज्या पद्धतीच राजकारण झालं, ते पाहता मनोज जरांगे यांच्या फॅक्टरमुळे भाजप नेत्या पंकजा मुंडे पराभूत झाल्या. मात्र या मतदार संघात मराठा विरुद्ध ओबीसी असं ज्या पद्धतीचे वातावरण निर्माण झालं, त्यानं मात्र राज्यातलं राजकारण मोठ्या प्रमाणात खवळलं. त्यामुळे बीड जिल्ह्यातल्या यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील, महायुती समोर कठीण प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच विद्यमान आमदाराला तिकीट द्यायचं की नवीन उमेदवार द्यायचा, अशा पद्धतीचा पेच महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यासमोर आजच्या घडीला उभ आहे. दरम्यानच लक्ष्मण पवार यांनी एका कार्यक्रमात आपण विधानसभा लढवण्यासाठी फारसे इच्छुक नसल्याचे वक्तव्य केलं होतं, अर्थात हे वक्तव्य करताना पक्षांतर्गत स्पर्धा, आणि लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवाराचा झालेला पराभव, पार्श्वभूमीवर हे वक्तव्य होतं.
मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये बीड लोकसभेला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना जिल्ह्यातल्या गेवराई आणि बीड विधानसभा या दोन मतदारसंघातून सर्वाधिक लीड मिळालेल आहे. गेवराई मध्ये भाजपचे आमदार लक्ष्मण पवार, आणि अजित पवार पक्षाचे अमरसिंह पंडित हे दोन महत्त्वाचे महायुतीचे नेते असताना, या मतदारसंघातून बजरंग सोनवणे यांना लीड मिळालं, हे विशेष आहे. त्यामुळे हे दोन्ही मतदारसंघ महायुतीच्या विरोधात आहेत, किंवा महायुती या दोन्ही मतदारसंघातून मागे पडली आहे असं म्हणावं लागेल. लक्ष्मण पवार हे भाजपचे विद्यमान आमदार असताना पंकजा मुंडे यांना लीड मिळवून देण्यात त्यांना अपयश आलं, त्यामुळेच यंदाची विधानसभा पवार यांना काहीशी कठीण जाण्याची शक्यता आहे, किंवा मग महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल त्याच्यापुढे यंदा संघर्ष आहे.
गेवराई मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून बदामराव पंडित यांना उमेदवारी जाहीर
Maharashtra Assembly Election 2024 Georai
दरम्यान, या मतदारसंघातून सध्या ठाकरे गटात असणारे बदामराव पंडित यांना उमेदवारी जाहीर झाली आहे, अर्थात महाविकास आघाडीने त्यांना तिकीट दिले आहे. तसेच महायुतीमध्ये मात्र अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये असणारे अमरसिंह पंडित, विजयसिंह पंडित हे देखील यंदाच्या विधानसभेला या मतदारसंघातून इच्छुक आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये पंडित बंधू किंवा भाजपचे लक्ष्मण पवार या दोन नेत्यात स्पर्धा असणार आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी कडून बदामराव पंडित, पूजा मोरे यांच्या नावाची चर्चा होती पणआहे. बदामराव पंडित यांची कारकीर्द तशी दीर्घ आहे, अनेक टर्म ते या मतदारसंघाचे आमदार होते. त्यामुळे त्यांना विधानसभा निवडणूक लढवण्याचा, आणि मतदारसंघाचा चांगला अभ्यास आहे. त्यामुळेच बदामराव पंडित यांना उमेदवारी दिली गेली असावी त्यांच्या तुलनेत पुजा मोरे या तशा नवख्या आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीवेळी देखील बजरंग सोनवणे यांच्यासारख्या उमेदवाराला मतदारांनी मतदान केल्यामुळे पूजा मोरे यांना देखील इथून उमेदवारीची संधी असल्याचे म्हटलं जात होत. तसं पाहिलं तर या मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हीतल्या इच्छुकांची स्पर्धा असणार आहे. त्यामुळे बंडखोरी होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. मात्र, भाजपकडून लक्ष्मण पवार यांनाच तिकीट मिळण्याची जास्त शक्यता आहे, कारण ते विद्यमान आमदार आहेत.
लक्ष्मण पवार यांच्यापूर्वी अर्थात 2014 पूर्वी पंडित कुटुंबामध्ये आलटून पालटून सत्ता खेचली जायची. कधी बदामराव पंडित, तर कधी अमरसिंह पंडित असेच काका पुतणे एकमेकांपुढे आव्हान देत राहिले. 2014 ला देशातलं वातावरण बदललं, त्यामुळे सहाजिकच राज्यात देखील वातावरण बदललं त्याचा फटका पंडित कुटुंबाला बसला आणि भाजपचे लक्ष्मण पवार विजय झाले. आणि तब्बल 34 वर्षाच्या पंडित कुटुंबाच्या वर्चस्वाला लक्ष्मण पवार यांनी धक्का दिला. 2014 साली पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आलेल्या लक्ष्मण पवार यांना एक लाख छत्तीस हजार इतकी मतं मिळाली, तर बदामराव पंडित यांना 76 हजार तीनशे मतं मिळाली.
हेही वाचा :https://newstapu.com/who-will-stop-ghansawangi-tope/
पंडित कुटुंबातून पुन्हा एकदा बंडखोरी होईल ?
2019 च्या विधानसभा निवडणुकीत लक्ष्मण पवार यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून विजयसिंह पंडित हे उभे राहिले होते, तेव्हा बदामराव पंडित यांनीही अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तिरंगी झालेले या लढतीमध्ये लक्ष्मण पवार निवडून आले.
यंदाच्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी पवार यांच्यासोबतच अमरसिंह पंडित, विजयसिंह पंडित हे नेते महायुतीकडून इच्छुक आहेत. हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा पारंपारिक मतदारसंघ असल्यामुळे शरद पवार हे महाविकास आघाडीला बळ देतील , तसेच आजच्या घडीला एकूणच बीड जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षण आंदोलनाचं चांगलच वातावरण आहे. त्यामुळे या मतदारसंघात मनोज जरांगे यांचा फॅक्टर महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. जरांगे ज्या उमेदवाराच्या पाठीमागे राहतील त्या उमेदवाराला इथला विजय सोपा जाण्याची शक्यता आहे. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वी इथला सामना हा महायुती असो की महाविकास आघाडी असो, यांच्यात तिकीट मिळवण्यासाठी होईल. तसंच तिकीट मिळवल्यानंतर बंडखोरीची लागण या मतदारसंघात लागते का? ? हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे, किंबहुना त्यावरच इथलं राजकारण देखील ठरण्याची शक्यता आहे. तुम्हाला काय वाटतं? आमदार लक्ष्मण पवार यांच्यासाठी या मतदारसंघात यंदा आव्हान कसं राहील ? तसंच पंडित कुटुंबातून पुन्हा एकदा बंडखोरी होईल का ?
https://www.lokmat.com/elections/maharashtra-assembly-election-2024/amravati-ac/georai/