Malegaon Outer Assembly Election 2024 मालेगावात भाकरी फिरणार दादा भुसे खरंच पडणार ?

Maharashtra Vidhansabha Election 2024 मालेगावात काय घडणार ?

मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे नेते दादा भुसे यांचं एक हाती वर्चस्व आहे. त्यामुळेच त्यांनी विरोधात आजवर कोणताही नेता मोठा होऊ दिला नाही, किंवा प्रबळ विरोधक होऊ दिला नाही. शिवसेनेमध्ये बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांना साथ देणाऱ्या शिलेदारांमध्ये भुसे हे ही आघाडीवर होते. त्यामुळे साहजिकच उद्धव ठाकरे दादा भुसे यांच्यावर नाराज आहेत. गद्दारांना धडा शिकवण्याच्या उद्देशाने, त्यांच्याशी गद्दारी करणाऱ्या नेत्यांविरोधात पर्यायी नेते ठाकरे उभे करत आहेत.
आणि यंदाच्या विधानसभेला भुसेंचा पराभव कसा होईल ? यासाठी राजकीय खेळी ते करतील. मागच्या चार टर्म पासून दादा भुसे आमदार असल्यामुळे त्यांना त्यांच्या क्षमतेची जाण आली असावी, म्हणूनच ठाकरे विरोधात बंडखोरी करण्याचे धाडस भुसे यांनी केलं. एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात भूसेना स्थान देण्यात आलं असलं तरी, भुसे हे ठाकरेंच्या मंत्रिमंडळातही मंत्री होते. मात्र असं असूनही त्यांनी शिंदे यांची साथ दिली. याच भुसे यांच्या मालेगाव बाह्य मतदार संघाबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.

भुसे हेच महायुतीचे उमेदवार असतील

 

dada bhuse
dada bhuse

सुरुवातीला म्हंटल्या प्रमाणे, गेल्या चार टर्म पासून भुसे या मतदारसंघातून विजय होत आले आहेत. त्यामुळे सहाजिकच यंदाच्या विधानसभेला हे भुसे हेच महायुतीचे उमेदवार असतील, हे निश्चित आहे. भाजप महायुतीची साथ, आणि मतदारसंघात केलेला विकास याच मुद्द्यावर भुसे पुन्हा एकदा मतदारांना सामोरे जातील. चार टर्म पासून कार्यकर्त्यांची तयार केलेली फळी, विद्यमान सरकार मध्ये कॅबिनेट मंत्री असल्यामुळे मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी भुसे यांना काही प्रमाणात सोपं जाईल, असं असलं तरी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनेही आपले डावपेच टाकायला सुरुवात केली आहे, त्यामुळे यंदाची विधानसभा भुसेना जड जाईल असं बोललं जात आहे. 2019 साली दादा भुसे यांनी काँग्रेसच्या तुषार शेवाळे यांचा पराभव केला. त्यामुळे काँग्रेसही या मतदारसंघावर दावा सांगेल, महाविकास आघाडी म्हणून ज्या जागांवर शिवसेना आणि काँग्रेस यांच्यामध्ये वाद आहेत, त्यापैकी मालेगाव बाह्य हा मतदारसंघ असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र यंदाच्या विधानसभेला हा मतदारसंघ शिवसेना विरुद्ध शिवसेना होण्याची दाट शक्यता आहे. आणि या मतदारसंघात ठाकरे पक्षाकडून अद्वय हिरे हे विधानसभेच्या रिंगणात येण्याची शक्यता आहे. किंबहुना त्यासाठीच हिरे यांनी ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याचे सांगितलं जातंय. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी हिरे हेच यंदाचे उमेदवार असतील, अशी घोषणा काही महिन्यांपूर्वी केली होती.

adway hire
adway hire

यंदाच्या लोकसभेला नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे नेते राजाभाऊ वाजे विजयी झाले. . त्यामुळे या मतदारसंघात आणि एकूणच नाशिक जिल्ह्यात शिवसेना ठाकरे पक्षाचा आत्मविश्वास सध्या गगनाला आहे. असं असलं तरी मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघ धुळे लोकसभा मतदारसंघात येतो. विधानसभा लढवण्याचा निर्णय घेत अद्वय हिरे यांनीही भाजपमधून शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश केला, हिरे यांच्यासारखा प्रबळ नेता भूसें विरोधात पक्षात घेतला असला तरी याशिवाय उद्धव ठाकरेंनी भुसे यांचे कट्टर समर्थक बंडू बच्छाव यांनाही शिवसेनेत प्रवेश दिला.

बच्छाव हे दादा भुसे यांचे अनेक वर्षांचे मित्र. त्यामुळे भुसे यांचं राजकारण बंडू बच्छाव यांनी जवळून पाहिलं. तोच नेता आता आपल्याकडे खेचण्यात ठाकरेंनी यश मिळवलं. सद्यस्थितीचा विचार केल्यास बंडू बच्छाव आणि अद्वय हिरे असे दोन नेते दादा भुसे यांच्या विरोधात ठाकरेंनी उभा केले आहेत. शिवाय दोघांनीही दादा भुसे यांच्या विरोधात मोर्चे बांधणी सुरू केली आहे.

Malegaon Outer Assembly Election 2024

ठाकरे गटाकडून अद्वय हिरे हेच उमेदवार असण्याची दाट शक्यता असून, बच्छाव हे हिरेना साथ देतात की उमेदवारीवर ठाम राहतात, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र बंडू बच्छाव यांनी अलीकडेच 12 बलुतेदार संघाच्या पदाधिकारी नेत्यांचा आपल्याला पाठिंबा असल्याचे म्हटला आह, त्यामुळे सर्व ताकदीनिशी आपणही विधानसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी तयार आहोत असे ते म्हणाले. शिवाय अद्वै हिरे आणि बंडू बच्छाव यांच्यात चांगली दिलजाई आहे. त्यामुळे या दोघांपैकी कुणीही बंडखोरी करणार नाही, त्यापैकी एकमताने निर्णय होईल, आणि एक उमेदवार फिक्स होईल असं बोललं जात आहे. त्यामुळे दादा भुसे यांच्यासाठी ही काहीशी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. तसं पाहिलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये, आणि मालेगाव या मतदारसंघांमध्ये हिरे घराण्याची मोठी परंपरा. आजोबा काका पुतण्या, वडील, अगदी चार पिढ्यांनी हिरे घराण्याच्या या मतदारसंघावर आणि जिल्ह्यावर राज्य गाजवलं. त्यामुळे हिरे यांची ताकद मोठी असल्याचे बोलले जात आहे. मालेगाव बाह्य हा मतदारसंघ लोकसभेला धुळे लोकसभा मतदारसंघात होता. त्यावेळी निश्चितच भाजपसाठी दादा भुसे यांनी लीड देण्याचं काम केलं. मात्र काँग्रेसच्या शोभा बच्छाव या लोकसभेला विजयी झाल्या. अर्थात लोकसभेला दादा भुसे यांनी लीड मिळवून दिल्यामुळे या मतदारसंघात तेव्हा भुसे यांच्या बाजूने वातावरण होतं असं म्हणायला हरकत नाही. सद्यस्थितीला लोकसभेपासून ठाकरेंच्या सेनेतही आत्मविश्वास मोठा आहे. लोकसभेला एक हाती नऊ जागा जिंकल्यामुळे ठाकरेंचा आत्मविश्वासही गगनाला आहे.

या 10 कारणांमुळे फडणवीस गृहमंत्री म्हणून अपयशी ठरतात ?

ठाकरे यांच्या विरोधात गद्दारी केल्यामुळे, ठाकरे विधानसभेला भुसे यांच्या विरोधात नेमका कोणता डाव टाकतात. संजय राऊत यांच्या निकटवर्ती असणारे अद्वय हिरे हे आपली ताकद किती लावतात, तसंच महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस पक्षाची हिरे यांना आणि ठाकरे यांच्या उमेदवाराला किती मदत होते यावर देखील, या मतदारसंघाचे गणित असणार आहे. असं असलं तरी भुसे यांच्याकडे मोठा हिम्मतवान नेता म्हणून पाहिलं जातं. या हिमतीमुळेच त्यांनी ठाकरेंसोबत बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांचे साथ दिली. एकनाथ शिंदे यांच्या ही जवळचा नेता म्हणून दादा भुसे कडे आता पाहिले जात आहे. शिंदे यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आणि मतदारसंघातला विकास डोळ्यासमोर ठेवून निधी आणण्यात, भुसे यांनी यश मिळवल आहे. भुसे यांचे भाजपच्या पदाधिकाऱ्यांसोबतही चांगले संबंध आहेत. महायुती म्हणून भाजप शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या तीन पक्षांची भुसे यांना साथ असल्यामुळे त्यांचा पराभव करून ठाकरेंना इतकं सोपही जाणार नाही. तसंच यंदाच्या विधानसभेला इच्छुकांची संख्या पाहता, मतदार संघात बंडखोरीची लागण लागण्याची शक्यता व्यक्त होते आहे. वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम या पक्षाच्या उमेदवारांवरूनही इथलं राजकारण कसं वळण घेत, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सलग चार टर्म पासून आमदार असणाऱ्या भुसे यांच्या विरोधात काहीशी नाराजी ही असून, त्याचाही फटका भुसेना बसू शकतो, अशी एक दुसरी शक्यता आहे.
अशा समीकरणांमध्ये येणारे विधानसभा कोणाच्या बाजूने कौल देते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे? तुम्हाला काय वाटतं दादा भुसे, अद्वय हिरे कि बंडू बच्चाव तिघांपैकी कोण मैदान मारेल ?

https://www.lokmat.com/politics/against-dadaji-bhuse-uddhav-thackerays-shiv-sena-announced-advay-hire-as-candidate-for-malegaon-outer-assembly-constituency-a-a571/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *