Manoj Jarange On Assembly Election 2024 : जरांगे फॅक्टरचा मराठवाड्यात सर्वाधिक कोणाला धोका ?
राज्यात विधानसभा निवडणुकीचा माहोल सुरू झाला आहे. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघातला उमेदवार आणि मतदार संघातील वातावरण, याचा अंदाज घेऊन प्रत्येक पक्ष निवडणूक लढवेल. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील जागावाटप एक ते दोन दिवसात फायनल होऊन उमेदवारी जाहीर होईल असे सांगितले जात आहे. मात्र मराठवाडा विभागामध्ये मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षण आंदोलनाचा प्रभाव पाहता, त्याचा फटका हा महायुतीला बसेल असं सांगितलं जात आहे. त्याचाच अंदाज आपण घेणार आहोत.
Manoj Jarange On Assembly Election 2024 :
यंदाच्या विधानसभेला महायुती मराठवाड्यामध्ये कशा पद्धतीने निवडणुका लढवते , हे पाहणं खरंच इंटरेस्टिंग असणार आहे. 2019 साली मराठवाड्यात भाजपने 16 जागा जिंकल्या होत्या. त्यावेळच्या शिवसेनेने 12 जागांवर विजय मिळवला होता, तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षांने प्रत्येकी 08 जागा आपल्या पदरात पाडून घेतल्या होत्या. त्यामुळे तेव्हाचा विचार केल्यास महायुतीसाठी मराठवाडा पोषक होता, असं म्हणायला हरकत नाही. मात्र आजच्या घडीला महायुतीसमोर मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाच आव्हान असणार आहे, हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे या आव्हानाला तोंड देताना, महायुती नेमकी कोणती स्ट्रॅटेजी वापरते, हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल. मनोज जरांगे पाटलांनी नुकतीच अंतरवली इथे एक बैठक घेत, आपण ज्या ठिकाणी निवडून येवु शकतो आश्या ठिकाणी उमेदवार देऊ व इतर ठिकाणी आपल्या मागण्यांना जो उमेदवार पाठींबा देईल त्याला पाठींबा देऊ आशी भूमिका जाहीर केली आहे Manoj Jarange On Assembly Election 2024 तसेच त्यांनी मराठा समाजाला 100 टक्के मतदान करण्याचं आवाहनही केलं आहे. महायुतीला आणि भाजपाला त्यांची जागा दाखवून द्यायची अशा पद्धतीचा पण देखील जरांगे पाटलांनी व्यक्त केला.
Manoj Jarange Assembly Election 2024
त्यापूर्वी अमित शहा मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते. छत्रपती संभाजीनगर येथे त्यांनी महायुतीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक घेतली. तेव्हा मराठवाड्यात आपल्याला 30 जागा जिंकून आणायच्या, त्यासाठी आपण प्रयत्न करू असं शहा यांनी कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना सांगितलं. मात्र ग्राउंड वरती महायुतीच्या विरोधात नेमकं वातावरण कस आहे, याचा विचार केल्यास. राजकीय विश्लेषकांचे वेग-वेगळे मत यावर व्यक्त होत आहेत. लोकसभा निवडणुकी वेळी मराठवाड्यात छत्रपती संभाजी नगरची जागा वगळता, महायुतीला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. केंद्रीय मंत्री असणारे रावसाहेब दानवे, आजवर कधीच पराभूत झाले नव्हते. त्यांचा देखील पराभव झाला. बीडमध्ये पंकजा मुंडेंना पराभूत करण्यात आलं. त्यामुळे त्या वेळची असणारी मराठा समाजाची प्रतिक्रिया, विधानसभा निवडणुकी वेळी जरी कायम राहील, तर त्याचा फटका भाजपला आणि महायुतीला निश्चित बसेल असं सांगितलं जात आहे.
विधानसभा निवडणुकीत आमच्यासाठी ‘जरांगे फॅक्टर’ वजा, आंबेडकर
विदर्भात भाजप काहीस पुढे राहण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने, अनेक नेत्यांना पक्षात प्रवेश दिल्यामुळे महाविकास आघाडी प्लस मध्ये राहील असं सांगितलं जात आहे. मात्र मराठवाड्याच्या मराठा समाजाच्या प्रभावामुळे, मराठवाड्याच्या लगत असणाऱ्या बुलढाणा, वाशिम किंवा सोलापूर, अहमदनगर या जिल्ह्यामध्ये मनोज जरांगे यांचा फॅक्टर चालेल असं सांगितलं जात आहे. दुसरीकडे भाजप देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करू पाहत आहे. किंवा त्या पद्धतीची हालचाल भाजपकडून होते आहे. फडणवीस यांना मुख्यमंत्री करणार असं नरेटिव्ह तयार केल्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढेल, आणि ते पक्षाचे काम जोरदार करतील, असे यामागे सांगितलं जात आहे. मात्र त्याचवेळी जरांगे पाटलांनी फडणवीसांनाच एकट्याला टार्गेट करायला सुरुवात केली आहे. सुरुवातीपासूनही मराठा आरक्षणाच्या विरोधात फडणवीस आहेत. त्यांनीच मराठ्यांना आरक्षण मिळवून दिलं नाही असे वारंवार आरोप मनोज जरांगे पाटलांनी केले. त्यामुळे फडणवीसांच्या चेहऱ्याला मराठवाड्यात निश्चितच विरोध होण्याची शक्यता व्यक्त होते आहे.
लोकसभा निवडणुकीवेळी मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये फडणवीसांना प्रचाराला येता आलं नाही. तेव्हा मराठा समाजाची नाराजी फडणवीस यांच्या विरोधात जोरदार होती. त्यामुळे त्याच फडणवीसांना मुख्यमंत्री पदासाठी भाजप जर पुढे आणत असेल, तर त्याचा फटका हा मराठवाड्यात भाजपला जबरदस्त बसू शकतो असं सांगितलं जातंय. आज घडीला 30 जागा निवडून आणू अशी शहांची भाषा आहे, त्याच वेळी एकही जागा भाजपची जिंकू देणार नाही असा पण जरांगेंचा आहे. जर 30 जागांपैकी 20 ते 25 जागांवर महायुतीला मराठवाड्यात फटका बसल्यास, महायुती महाराष्ट्रात चांगलीच बॅक फुटला जाऊ शकते, असं विश्लेषण राजकीय विश्लेषक करत आहेत.
Manoj Jarange On Assembly Election 2024
पाटील मराठा समाजाचे स्वतंत्र उमेदवार कुठे देतात ?
मराठवाड्यामध्ये लोकसभेला काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, आणि राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाने चांगलं यश मिळवलं. त्यातली त्यात काँग्रेस मराठवाड्यात सर्वाधिक पुढे राहिली. मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे या विधानसभेला स्वतंत्र उमेदवार कुठे देतात, की केवळ लोकसभेप्रमाणे महायुतीचे उमेदवार पाडण्याचा प्रयत्न करतात, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. किंबहुना यावरच महाविकास आघाडीचे भवितव्य ठरणार आहे. ज्या पद्धतीने लोकसभेला जरांगे पाटलांचा महाविकास आघाडीला फायदा झाला, तसाच निर्णय महायुतीचे उमेदवार पाडण्याचा जर जरांगे पाटलांनी घेतला, तर त्याचा सरळ महाविकास आघाडीला फायदा होईल.आचारसंहिता लागू होण्यापूर्वी Manoj Jarange पाटलांनी नारायण गडावर दसरा मेळावा घेतला. या दसरा मेळाव्याला लाखो मराठा समाज जमला होता. त्यामुळे मराठा समाजाला एक गठ्ठा ठेवण्याचं काम जरांगे पाटलांनी केलं आहे हे त्याचे एक प्रमाण आहे. त्यामुळे जरांगे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, मराठवाड्यातला मराठा समाज महायुतीला, फटका देण्याच्या तयारीत असल्याचे सांगितलं जात आहे. भारतीय जनता पक्ष मराठवाड्यामध्ये आपले उमेदवार जाहीर करताना, काही काळजी घेईल असं म्हटलं जात आहे. मराठा उमेदवार देत असताना तो किती मतदार आपल्या पारड्यात पाडू शकतो, याचाही विचार पक्ष करेल असं सांगितलं जात आहे. मात्र थोडसं आपण पाठीमागे गेलो तर अनेक भाजपचे आणि महायुतीचे नेते आंतरवाली सराटीत दाखल झाले होते, तेव्हा त्यांनी जरांगे पाटलांसोबत चर्चा केली होती. मात्र तेच नेते आज जरांगे फॅक्टरला पूर्णपणे जाणून आहेत, त्यामुळेच त्यांनाही जरांगे पाटलांच्या ताकदीचा आणि मराठा समाजाच्या ताकदीचा अंदाज येतो आहे. त्यामुळे कुठेतरी ओबीसी आणि इतर बहुजन समाज यांचं मतदान भाजपला 100% आपल्याकडे वळती करावे लागेल, शिवाय गनिमी काव्याने अनेक मराठा मतदानही मिळवावे लागेल. तरच भाजपला मराठवाड्यात काही जागा आपल्या पदरात पाडून घेता येतील.
BJP ला मराठवाड्यात किती जागा मिळतील ?
त्यासोबतच मराठा बहुल मतदारसंघांमध्ये अनेक अपक्ष उमेदवार देत, मराठा समाजाच्या मतदारांमध्ये ध्रुवीकरण देखील भाजपकडून केल्या जाऊ शकतं, असं जर केलं तर त्याचा फायदा हा भाजपलाच होईल, असं राजकीय विश्लेषक सांगत आहेत. त्यासोबतच एम आयएम आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार बहुजन समाजाच आणि मुस्लिम समाजाच मतदान आपल्या पदरात किती प्रमाणात पाडून घेतात, या पक्षांच्या उमेदवारामुळे मुस्लिम आणि दलितांच्या मतांमध्ये ध्रुवीकरण झाल्यास, त्याचा फटका महाविकास आघाडीला बसू शकतो. मात्र त्याचवेळी एक गठ्ठा मराठा समाजाची मते, महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पारड्यात गेल्यास, महाविकास आघाडीचे उमेदवार तिथून विजयी होऊ शकतात. सद्यस्थितीला वंचित बहुजन आघाडीने काही जागावर आपले उमेदवार जाहीर केले आहेत, त्यात मराठवाड्यातल्याही काही जागांचा समावेश आहे. एम आयएम चा स्टँड सध्या स्पष्ट नसला तरी, नुकतेच मनोज जरांगे पाटील आणि इम्तियाज जलील यांची झालेली भेट, बरच काही सांगून जाणारी आहे. एकूणच सद्यस्थितीला मराठवाड्यात महायुती, 30 जागा जिंकू असा आत्मविश्वास व्यक्त करत असली तरी, जरांगे फॅक्टर मुळे महायुतीला दोन अंकी संख्या ही गाठता येईल की नाही? असं विश्लेषण होत आहे. तुम्हाला काय वाटतं, भाजपाला मराठवाड्यात किती जागा मिळतील, याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.