Parner Vidhansabha पारनेरमध्ये लंकेना घेरणार विखे दादांच्या मदतीने पराभवचा वचपा काढणार ? Vidhansabha 2024 Best
यंदाच्या नगर लोकसभेला विखेच्या साम्राज्याला सुरुंग लावणारे नेते म्हणून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार निलेश लंके चर्चेत आले. वीकेंसारखा तुल्यबळ नेता पराभूत झाल्यामुळे लंकेंकडे जायंट किलर म्हणून पाहिलं गेलं. मात्र हे सगळं लोकसभेवेळी घडलं. आता राज्यात विधानसभेचे वातावरण आहे. निवडणुकीचा माहोल सध्या राज्यभरात आहे. त्यामुळे निलेश लंके ज्या मतदार संघातून पहिल्यांदा विधानसभेवर गेले त्या पारनेर विधानसभा मतदारसंघाबद्दल, या मतदारसंघातल्या सद्यस्थितीबद्दल आपण बोलणार आहोत.
2019 ला निलेश लंके पहिल्यांदा पारनेर मधून विधानसभेवर निवडून गेले. सलग तीन टर्म पासून आमदार म्हणून निवडून येणाऱ्या शिवसेनाच्या विजय आवटी यांचा निलेश लंके यांनी पराभव केला. नंतर कोविडच्या काळात रुग्णांसाठी केलेलं अमूल्य काम, त्यावेळी निलेश लंके मोठ्या प्रसिद्ध झोतात आले. नंतरच्या काळात महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी सारखे पक्ष फुटले. तेव्हा निलेश लंके यांच्या मनात दोन्ही राष्ट्रवादी बद्दल ममत्व होतं. मात्र सत्ताधारी महायुतीमध्ये अजित पवार गेल्यामुळे सुरुवातीला लंकेनी अजित पवारांची साथ दिली. मात्र लोकसभा निवडणुकीवेळी त्यांच्या नावाची चर्चा होत गेल्यामुळे. तसेच शरद पवारांनी लोकसभा उमेदवारीचा शब्द दिल्यामुळे लंकेनी जेष्ठ पवारांची साथ दिली. शरद पवारांचा करिष्मा आणि निलेश लंके यांची प्रसिद्धी लोकसभेला फळाला आली, आणि लंके यांनी सुजय विख्यांचा पराभव केला. निलेश लंके लोकसभेवर निवडून गेल्यामुळे त्यांच्या पारनेर मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा उमेदवार कोण असेल, याबद्दल मधल्या काळात मोठ्या चर्चा झाल्या. मात्र मतदारसंघांमध्ये त्यांची पत्नी राणी लंके यांचे भावी आमदार म्हणून लावण्यात आलेले फ्लेक्स पाहता. राणी लंके याच पारनेरच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार असतील असं बोललं गेलं. निलेश लंके यांचा मतदारसंघ असल्यामुळे लंकेच्या शब्दाशिवाय इथला उमेदवार ठरणार नाही, हेही तितकच खरं आहे. शिवाय ही जागा निलेश लंके यांच्यासाठी प्रतिष्ठेचीही आहे असं बोललं जात आहे.
मात्र सद्यस्थितीला महाविकास आघाडी मधला शिवसेना ठाकरे गटही या जागेवर आग्रही असल्याचे दिसून येत आहे. श्रीकांत पठारे हे या जागेसाठी आग्रही आहेत. तशी तयारी देखील त्यांनी मागच्या काळात केली आहे, मतदार संघातल्या भेटीगाठी आणि पदाधिकाऱ्यांची फळी निर्माण करण्यात पठारे यांनी यश मिळवल आहे. तसेच घरात एक खासदारकी असताना, लंके यांनी आमदारकींचा हट्ट सोडावा, पूर्वीपासून ही जागा शिवसेनेची असल्यामुळे आमचाच या जागेवर हक्क आहे, असं पठारे यांच्यासह शिवसैनिकांना वाटत आहे. राणी लंके यांचं नाव जरी चर्चेत असलं तरी, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून अनेक नेते या मतदारसंघासाठी इच्छुक आहेत. अगदी ठाकरेंच्या सेनेच्या नेत्यांचाही यामध्ये समावेश आहे. त्यामुळे अनेकांनी शरद पवार यांची भेट घेत या जागेवरून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ऐनवेळी शरद पवार किंवा महाविकास आघाडी इथून उमेदवारी कोणाला देते यावरूनही इथलं राजकारण ठरण्याची शक्यता आहे. तिकडे दुसरीकडे महायुतीकडून राष्ट्रवादी अजित पवार पक्ष ही या जागेसाठी आग्रही आहे. 2019 ला ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्यामुळे सहाजिकच महायुतीकडून आपला पारंपारिक मतदारसंघ म्हणून अजित पवारांचा पक्ष हक्क दाखवू शकतो. अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्षाचे नेते सुजित झावरे, प्रशांत गायकवाड यांच्या नावाची इथून चर्चा होते आहे. तसेच काशिनाथ दाते यांच्याही नावाची चर्चा होते आहे. याशिवाय भाजपकडून विश्वनाथ कोरडे, सुनील थोरात या नेत्यांच्या नावाची ही मतदारसंघात चर्चा आहे. तशी तयारी हे नेते करतायेत असं बोललं जातंय. मात्र असं असलं तरी पारंपारिक आपला मतदारसंघ म्हणून महायुतीकडून अजित पवारांचा पक्षच ही जागा लढवेल, असं सूत्रांचे म्हणणं आहे. त्या दृष्टीने अजित पवारांनी आपले डाव या मतदारसंघात टाकायला सुरुवात केली आहे. शरद पवारांच्या पक्षातील महत्त्वाचे नेते आपल्याकडे खेचून घेण्यात अजित पवार सध्या प्रयत्नात आहेत. नुकतंच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माधवराव लामखेडे, विजय आवटी, शिवाजीराव गुजर या नेत्यांना अजित पवारांनी आपल्याकडे खेचण्यात यश मिळवल आहे. त्यामुळे महायुती लंकेच्या विरोधात जोरदार तयारी करत असल्याचा दिसून येत आहे. सुजित झावरे हेच अजित पवार पक्षाचे उमेदवार होतील, अशा पद्धतीच्या बातम्या मध्यंतरीच्या काळात ऐकायला आल्या. झावरे हे मागच्या अनेक वर्षांपासून राजकारणात आहेत. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेला आहे. त्यामुळे सहाजिकच त्यांचा जनसंपर्क मोठा आहे. महायुती म्हणून भारतीय जनता पक्ष अजित पवारांच्या पक्षाला या मतदारसंघात साथ देईल, हे मात्र निश्चित आहे. सुजय विखे आणि विखे कुटुंब लंकेचा हा मतदारसंघ जिंकण्यासाठी अजित पवारांना ताकद पूर्वेला असं सांगितलं जात आहे. कारण पारनेर मतदार संघात निलेश लंके यांची प्रतिष्ठा आहे. त्यामुळे लंकेची प्रतिष्ठा घालवण्यासाठी विखे कुटुंब निश्चितच या जागेवर ताकद लावेल, आणि लोकसभेतल्या आपल्या पराभवाचा वाटपा काढेल, असं म्हटलं जात आहे.
आजच्या घडीला लंके लोकसभेवर निवडून गेल्यामुळे मोठ्या आत्मविश्वासात आहेत. विखे कुटुंबाच्या गडाला सुरू लावल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था आणि स्थानिक प्रशासनात देखील लंके यांनी विखे यांना टक्कर द्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे लंकेंना होम ग्राउंड वर पराभूत करणं महायुतीसाठी तेवढं सोपं देखील नाही. आमदार म्हणून मागच्या चार वर्ष निलेश लंके आणि मतदारसंघात जोरदार बांधणी केलेली आहे. कोविडच्या काळात केलेली काम त्यामुळे सर्वसामान्यांचा नेता म्हणून निलेश लंके यांची ओळख आहे. आणि हीच लंके यांची जमेची बाजू आहे.
शरद पवारांनी आपली ताकद लावल्यास लंके पारनेर मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळवू शकतात. मात्र हे करण्यासाठी सर्वात आधी निलेश लंके यांना महाविकास आघाडीतल्या नेत्यांसोबत संघर्ष करावा लागू शकतो. आणि या संघर्षाच्या राजकारणात अनेकदा आपल्याच नेत्यांकडून घात होण्याची शक्यता असते. त्यामुळे हा मतदारसंघ नेमका कोणाच्या वाट्याला जातो, त्यानंतर मित्र पक्षांच्या प्रतिक्रिया, काय ठरतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र, लोकसभेला विखेंचा पराभव केल्यामुळे विखे देखील लंकेच्या विरोधात पेटून उठतील असे बोलले जात आहे. त्यातच पवार आणि विखे या घराण्यातला पारंपारिक संघर्ष असल्यामुळे, या जागेवर अटीतटीच राजकारण होण्याची शक्यता आहे. तुम्हाला काय वाटतं पारनेर मध्ये राणी लंके याच आमदार होतील, की राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाची हवा चालेल का? तसेच महाविकास आघाडी कडून ही जागा कोण लढवेल, असं आपल्याला वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.